कोरोना साठी प्रतिबंधक वनौषधी

नमस्कार मंडळी. 
खालील काढा व कडूनिंब आणि हळद यांचे सेवन खालील प्रमाणे दररोज घेतल्याने करोनापासून संरक्षण होते व इन्फेक्शन झाले तरी माइल्ड होते.

१ काढा
खाली दिलेले मिश्रण मी जवळ जवळ २५ वर्षे दमा खोकला वगैरे करता वापरत आहे. आणि याचा हमखास फायदा होतो. म्हणून आज मी आपणासर्वां बरोबर शेयर करत आहे.

याचा उगम आयुर्वेदात आहे. आयुर्वेदात असे लिहिले आहे कि ज्या अंगणात अडुळश्याच झाड असेल त्या घरात फुफुसांच्या रोगाने अपमृत्यु येणार नाही. त्यावरून तयार केलेले व अत्यंत उपयुक्त असे हे मिश्रण खालील प्रमाणे आहे:

अडुळसा ५० ग्राम
तुळस ५० ग्राम
जेष्टीमध २५ ग्राम
गुळवेल २५ ग्राम
सुंठ २५ ग्राम
पिंपळी १० ग्राम
दालचिनी ५ ग्राम
वेलदोडा ५ ग्राम
काळे मिरे ५ ग्राम

या सर्वांची पूड एकत्र करून प्रत्येकी १/२ चमचा २ कप पाण्यात घालून १/२ कप पर्यंत आटवावे. सकाळी व संध्याकाळी चहा सारखे घ्यावे. सर्व औषध सहजगत्या मिळतात. मी तुळस आणि अडुळसा ताजा वापरते.

औषधापासून काय अपेक्षित आहे.

कोरोना हा विषाणू लाल रक्तपेशींना भेदून आपल्या पेशींपर्यंत प्राणवायू पोहोचू देत नाही. प्राणवायूची कमतरता झाल्याने श्वसनास त्रास होतो. त्यामुळे या विषाणूच्या त्रास पासून मुक्ती मिळवण्याचा एकुलता एक उपाय म्हणजे तुमच्या रोगप्रतिकारक पेशी कार्यरत असणे. हे काम आपण एका दिवसात करू शकत नाही. त्याची काळजी आपल्याला नेहमीच घ्यावयाची असते. परंतु या औषधांनी (१) श्वसनाचा त्रास कमी होईल (२) तापमान जास्त वर जाणार नाही. (३) पचनक्रिया चांगली राहील.  (४) फुफुसांना बळ मिळेल.

2 आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचे, अर्थात करक्यूमिन लोंगा म्हणजेच ओली हळद आणि कडुनिंब:

करक्यूमिन लोंगा  हळदीचे वैज्ञानिक किंवा लॅटिन नाव कर्क्युमिन लोंगा आहे.
अर्धा इंच हळदीचा तुकडा किसून पाऊण कप उकळत्या पाण्यात घालावा आणि झाकून ठेवावे. पाण्यात हळदी चा अर्क उतरतो. अर्ध्या मिनिटांनी ते पाणी गाळून प्यावे.

कडुनिंब:
कडूनिंबाची प्रत्येकी १० ते १२ पानं स्वच्छ धुऊन कपड्यावर सुकवून घ्यावी आणि त्याची चटणी करावी. त्यात तेवढाच गूळ घालून परत एकत्रित करून घ्यावे. दररोज सकाळी चहाचा पाव चमचा सेवन करावी.
ओली हळद आणि कडुनिंब: 
कडुनिंबाच्या प्रत्येकी १० ते १२ बारा पानांना अर्धा ईंच या प्रमाणात ओल्या हळदीचा  तुकडा घालून मिक्सर मधुन चटणी करावी व त्यात तितकाच गुळ घालून परत वाटून घ्यावं. रोज सकाळी एक छोटा चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावी.

ह्याच मिश्रणाच्या गोळ्या करून ठेवल्था तरी चालेल.

३ अतिदक्षता विभागात ऑक्सीजन वर असलेल्या रुग्णांकरिता वरील अर्धाकप काढ्यात कडुनिंबाची चाळीस पाने आणि अर्धा ईंचओली हळद घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावे. नंतर ते जाड फडक्याने गाळून घ्यावे. त्यात गूळ घालावा आणि जेवणाच्या डब्याबरोबर ज्युस म्हणून पाठवून द्यावे. हे मिश्रण चार भागात विभागून एका दिवसातून चार वेळा असे तीन दिवस द्यावे.  तीन दिवसा नंतर कडुनिंबाची दहा ते बारा पाने द्यावीत.

डॉक्टर अकल्पिता परांजपे